एक्स्प्लोर
#Crime 'माझा'च्या बातमीनंतर अपहरण झालेली मुलगी सापडली, नागपूरमध्ये 6 जुलैला गुडांकडून मुलीचं अपहरण
पोलिसांच्या तपासात जे पाच महिन्यात झाले नाही ते एबीपी माझाने बातमी दाखवताच पाच तासात झाले. काल संध्याकाळी एबीपी माझाने नागपुरातील एक आई गेल्या पाच महिन्यांपासून आपल्या अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेत असल्याची बातमी प्रसारित केली होती. पीडित आईने मुलीचे सहा जुलै रोजी अपहरण झाल्यानंतर लगेच रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर ही संबंधित एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कोणतीही मदत करत नसल्याचे दुर्दैवी सत्य ही एबीपी माझाने काल जगासमोर आणले होते.
आणखी पाहा
























