(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jaipur Train Crime Update : आरोपी चेतन सिंहबाबत सविस्तार माहिती एबीपी माझाच्या हाती
आरोपी चेतन सिंहबाबत सविस्तार माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. चेतन सिंह हा मूळचा उत्तर प्रदेशमधील हाथरसचा आहे. यापूर्वी त्याची पोस्टिंग गुजरातमध्ये होती. नुकतीच त्याची मुंबईत नियुक्ती झाली होती. तो मुंबई सेंट्रल आरपीएफमध्ये तैनात आहे. त्याचं पोलीस ठाणं हे लोअर परळ आहे. रविवारी रात्री दुसऱ्या एका ट्रेनमध्ये ड्यूटीवर होता. त्या ट्रेनमधून तोे सुरतला उतरला. त्यानंतर त्यानं काही वेळ त्यानं आराम केला, आणि मग पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी ड्यूटीचा भाग म्हणून तो जयपूर एक्स्प्रेसमध्ये चढला. त्याच्यासोबत आणखी दोन हवालदार आणि त्यांचे वरिष्ठ टीकाराम मीणा देखील होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर रेल्वे स्थानकावरून ट्रेन पास होत असताना चेतननं गोळीबार केला. विरार स्थानक गेल्यावर त्यानं चेन खेचली, आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र विरार रेल्वे स्थानकावरील पोलीस आधीच सतर्क झाले होते. त्यानं आरोपी चेतन सिंहला पकडलं. नंतर ट्रेन बोरिवली स्थानकात नेण्यात आली, जिथं मृतदेह खाली उतरवण्यात आले.