एक्स्प्लोर
Dombivali Bank Robbery : डोंबिवलीत बँकेवर डल्ला, 12 कोटी 20 लाख रुपयांची रोकड चोरी, तिघांना अटक
बातमी डोंबिवलीतील मानपाडा परिसरात एका बँकेतून तब्बल 12 कोटी 20 लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या चौघांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 कोटी 80 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला बँक कर्मचारी अल्ताफ शेख अजूनही फरार आहे. 9 ते 11 जुलै दरम्यान आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत चोरीचा हा प्रकार घडला होता. बँकेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानं अन्य तिघांच्या साथीनं 12 कोटी 20लाख रुपयांची रक्कम चोरली. या प्रकरणात एकूण 34 कोटी रुपयांची चोरी झाली होती. पण त्यातील 12 कोटी 20 लाख रुपये आरोपीनं लंपास केले, तर उर्वरित रक्कम बँकेच्या आवारातच सापडली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















