एक्स्प्लोर
Baramati : पत्नीच्या उपचाराकर्ता पैसे नसल्यानं पतीची आत्महत्या, कुतवळवाडीतील धक्कादायक घटना
पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याच्या नैराश्यातून पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथे घडली. आज पहाटे ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मनोहर संभाजी कुतवळ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी आकस्मित मयत नोंद केली आहे.
आणखी पाहा























