वास्तविक, सनीने नुकत्याच 'लस्ट बाय सनी लिओनी' या परफ्यूमच्या ब्रॅण्डसाठी फोटोशूट करुन लॉन्च केलं आहे. 'लस्ट बाय सनी लिओनी' या व्हेरिफाईड ट्विटर हॅण्डलवरुन सनीच्या एका फोटोसोबत एका ट्वीट केले गेले आहे. 'लस्ट बाय सनी लिओनी'च्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेल्या या ट्वीटला सनीनेही रिट्वीट केलं आहे.
2/3
'लस्ट बाय सनी लिओनी'च्या व्हेरिफाईड ट्विटर हॅण्डलवरुन केलेल्या ट्वीटमध्ये, ''आता तुम्ही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांशिवायही 'लस्ट बाय सनी लिओनी' परफ्यूमची ऑर्डर देऊ शकता, तेही कोणत्याही गडबडी शिवाय.'' 'लस्ट बाय सनी लिओनी' ट्विटर हॅण्डलवरुन सनीचाही तोच ब्रॅण्डेड परफ्यूम असल्याचे सांगण्यात येत आहे.
3/3
देशभरात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीनंतर सगळीकडेच प्रत्येकाची तारांबळ उडाली आहे. मोदींच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले, तरी काहींनी यावर टीकाही केली आहे. बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीनेही या निर्णयाच्या अनुषंगाने हटके ट्वीट केलं आहे.