Zero Hour : सुजय विखे - निलेश लंके लढाईला बाळासाहेब थोरातांचा कोन !
Zero Hour : सुजय विखे - निलेश लंके लढाईला बाळासाहेब थोरातांचा कोन ! बातमी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरमधली.. 1996 पर्यंत हा मतदार संघ काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला होता.. त्यानंतर मात्र इथे भाजपने बस्तान बसवलं. त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला आहे. अजितदादा महायुतीत आल्यानंतर खासदार सुजय विखेंसाठी पुन्हा खासदार होणं सोपं जाईल असं मानलं जात होतं पण अचानक दादांचे जवळचे समजले जाणारे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेले आणि त्यांना सुजय विखेंविरोधात तिकीटही मिळालं. लंकेंची कार्यशैली बघता भाजपने हे आव्हान गंभीरपणे घेतलं. रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच काँग्रेस नेते आणि विखेंचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांनी नगरमधील लढत श्रीमंत विरुद्ध गरीब असल्याची प्रतिक्रिया दिली, त्यावर सुजय विखे यांनी उत्तर दिलं, त्यात लंकेंच्या शिक्षणावरुन कटाक्ष करण्यात आले.. त्याला निलेश लंकेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं.. हा सगळा प्रकार नेमका काय आहे ते आपण या भागात पाहणार आहोत..