Zero Hour : ठाकरेंची शिवसेना मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील?
Zero Hour : ठाकरेंची शिवसेना मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील?
एकीकड़े भाजपनं मिशन विधानसभा सुरु केलंय.. त्यासाठी नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचंही वाटप झालंय.. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मध्यरात्री वर्षावर महत्त्वपूर्ण बैठक झालीये. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस अनुपस्थित होते, त्यामुळे फडणवीसांच्या अनुपस्थित नेमकं काय झालं याची उत्सुकता आहे. विधानसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर शिवसेनेनं केलेल्या अहवालावरही चर्चा झालीये. बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल, दादा भुसे, उदय सामंतही उपस्थित होते.
All Shows

































