Zero Hour : राहुल गांधींचा अमेरिका दौरा आणि वाद, राहुल गांधींच्या विदेशवारीचा भाजपला धसका?
Zero Hour : राहुल गांधींचा अमेरिका दौरा आणि वाद, राहुल गांधींच्या विदेशवारीचा भाजपला धसका?
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेेते खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.. आजचा दौऱ्याचा तिसरा दिवस... आणि तिसऱ्या दिवशीही दोन वाद झालेत.... बरं, फक्त आजच नाही.. तर वादांची ही मालिका... राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालीये... राहुल गांधींनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी टेक्सासमध्ये त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला.. एका कार्यक्रमात त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.. त्यांच्या भाषणात राज्यघटना बदलणार असल्याची भीती आणि रोजगार निर्मिती हे मुद्दे सुद्धा होते.. दुसऱ्या दिवशी... म्हणजेच काल... त्यांनी वॉशिंग्टन डिसीमध्ये जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.. देशात नरेंद्र मोदींची भीती होती मात्र लोकसभा निकालानंतर ती भीती नष्ट झाली अशी मांडणी त्यांनी केली. लोकसभा निवडणूक निपक्ष झाली नाही असा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं.. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभर फिरुन प्रचार करता यावा अशा पद्धतीने मतदानाच्या तारखा ठरवल्या होत्या असा आरोपही त्यांनी केला. भाजपकडे प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा आणि ती राबवण्यासाठी प्रचंड मोठा निवडणूक निधी होता असंही त्यांनी सांगितलं. ही लोकसभा निवडणूक निपक्ष झाली असती तर भाजपला आता मिळाल्या तेवढ्या २४० जागा सुद्घा मिळाल्या नसत्या असा दावा त्यांनी केला. आणि आज तिसऱ्या दिवशीही त्यांच्यासोबतच्या वादाची मालिका कायम राहिली... आणि आज राहुल गांधींनी एका मुलाखतीत आरक्षणावर भाष्य केलं... भारतात जेव्हा आरक्षणावरून पक्षपात होणार नाही, तेव्हा काँग्रेस पक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल असं राहुल म्हणाले. जॉर्जटाऊन विद्यापीठात त्यांची मुलाखत पार पडली, त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. या विधानावरून भारतात मात्र टीकेची झोड उठली आहे. बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केलीये.. अन्य पक्षांनी देखील राहुल यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. पण, त्यावर काँग्रेस पक्षासह अनेक मित्रपक्षांनी स्पष्टीकरणंही दिलं.