Zero hour PM Narendra Modi : घटकपक्षांकडून मोदींची निवड 'मोदी 3.0' चा मार्ग मोकळा ...
Zero hour PM Narendra Modi : घटकपक्षांकडून मोदींची निवड 'मोदी 3.0' चा मार्ग मोकळा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांची नेतानिवड म्हणून निवड झाली असून ते लवकरच राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. पण मोदींची ही तिसरी टर्म आधीच्या दोन टर्मसारखी असेल का ? कारण आधीची दोन आणि हे तिसरं सरकार यातला मोठा फरक म्हणजे अवलंबित्व..भाजपला मित्र पक्षांवर अवलंबून राहत राज्य करायचं आहे
लोकसभा निकालांनंतर आता नवे सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.. या नव्या सरकार स्थापनेसाठी चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे दोघे किंगमेकर ठरणार आहे.. एनडीएची साथ सोडून इंडिया आघाडीला साथ दिल्यास इंडिया आघाडीच सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.. नितीश कुमार यांचे १२ तर चंद्राबाबू नायडू यांचे १६ खासदार आहेत.. त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची गरज आहे..त्यामुळे हे दोन किंगमेकर कोणासोबत जाणार हे पाहणं महत्त्वाच आहे..