Zero Hour : नवनव्या योजनांचा महायुतीला विधानसभेत फायदा होणार?
एकिकडे सरकारकडून नवनव्या योजनांचा पाऊस सुरु आहे.. दुसरीकडे विरोधकांकडून टीकेची बरसात सुरु आहे.. निवडणुकांचा मौसम जवळ आला आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेलच.. लाडकी बहिण, लाडका भाऊ, बार्टी प्रमाणे आर्टी अशी मालिका सुरुच आहे..
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने लाडकी बहीण योजना आली तेव्हा विरोधक म्हणाले, लाडक्या भावांनी कोणता अपराध केलाय, त्यांना सुद्धा एखाद्या योजनेत बहिणींप्रमाणे पैसे मिळायला हवेत.. ती इच्छा काही प्रमाणात पूर्ण झाली कारण सरकारने "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" सुरु केली. या योजनेत नोंदणी केलेल्या उमेदवारांना सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत स्टायपेंड मिळणार आहे. १२ वी उत्तीर्ण असाल तर महिन्याला ६ हजार रुपये.. आय.टी.आय आणि पदविका उत्तीर्ण असणारांना ८ हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण असणाऱ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. या योजनेवर अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली, ते आपण पाहणार आहोतच आणि या विषयावरील आपला पहिला प्रश्न सुद्धा पाहणार आहोत.. पण त्या आधी या योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ते पाहुयात..