(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour : भाजपसमोर 182 जागांच्या अडचणी? जागावाटपावरून महायुतीत बंडखोरी होणार?
Zero Hour : भाजपसमोर 182 जागांच्या अडचणी? जागावाटपावरून महायुतीत बंडखोरी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटूंबभेट अभियान सुरु करत... १५ लाख महिलांना मुख्यमंत्र्यांचं पत्र देण्याचा कार्यक्रम सुरु केलाय.. भाजपनंही प्रचार समितीची स्थापना करत राज्यव्यापी कार्यक्रमांची आखणी सुरु केलीये.. तर लाडका दादा म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जनसन्मान यात्रा सुरु केलीये.. महायुतीचा प्रचार जरी दणक्यात सुरु झाला असला तरी प्रत्येकासमोर उभं राहिलंय... एक संकट...आणि ते आहे... बंडखोरीचं.. आणि राजकीय पक्षांतरांचं... त्याच सर्वात ताजं उहादरण आहेत... भाजपचे समरजितसिंह घाटगे... त्यांचा मतदारसंघ कागल... तिथून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांनी आपल्या कागल मतदारसंघातून हसन मुश्रिफांची उमेदवारी जाहीर केली... आणि समरजितसिंहांनी भाजपला राम राम ठोकला... आणि तुतारी हातात घेतली.. ही फक्त एक घटना नाही... तर जेव्हा निवडणुका जाहीर होतील... उमेदवाऱ्या जाहीर होतील,... तेव्हा खऱ्या अर्थानं बंडखोरीला उधाण येईल... पण, आता राज्यात जितक्या जोरात प्रचार सुरु आहे... तितक्याच धडाक्यात पक्षांतराच्या चर्चा.... आज काही मतदारसंघ पाहणार आहोत.. जिथं महायुतीतून पक्षांतरांची किंवा बंडखोरीची शक्यता आहे... कारण, आज घडीला महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये जवळपास साठ ते सत्तर मतदारसंघ असे आहेत.. जिथं किमान दोन पक्षांचे उमेदवार आमदारकीसाठी दावेदारी ठोकून आहेत..