Zero Hour Sanjay Raut Full : संजय राऊत यांच्यामुळे ठाकरे गट संपेल? महाजनांचा दावा खरा की खोटा?
गद्दार, भोंगा, दलाल असे शब्द आपण खरं तर कुणासाठीच वापरणार नाही. कारण आपण सामान्य माणसं तसं जरा संस्कृती-बिंस्कृती पाळत असतो. कुणाशी कसं बोलायचं याचे संकेत आपण मानत असतो. मात्र, आपल्या राजकारण्यांनी याबाबत सगळंच सोडून दिलंय असं वाटण्यासारखी स्थिती आहे. त्यात आता महापालिका निवडणुकाच तोंडावर असल्यानं असे शाब्दिक फटाके आणि लवंग्या रोज फुटणार हे तर उघडच आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे संजय राऊतांची ताजी वक्तव्य. आता तुम्ही विचाराल की संजय राऊतांची वक्तव्य तर आम्ही रोज पाहतो, ऐकतो....त्यात काय आता नवीन? तर नवीन आहे ती परिस्थिती आणि राऊतांनी गाठलेलं नवं सावज. मघाशी म्हटल्याप्रमाणे सध्या महापालिका निवडणुकांचा मौसम आहे आणि मुंबई, पुण्याखालोखाल नाशिक महापालिकाही प्रतिष्ठेची आहे. याच नाशिकमध्ये एका लग्नाला जमलेल्या या संजय राऊत आणि गिरीश महाजन या राजकीय व-हाड्यांमध्ये कलगीतुरा रंगला. यात महाजनांनी संजय राऊतांमुळे शिवसेना संपेल अशी टीका केली तर राऊतांनी महाजनांना पक्ष फोडणारा दलाल म्हटलं. आता या वादाला पुन्हा नाशिकच्या मिसळीच्या तर्रीसारखा झटका दिला तो ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बडगुजर यांनी. नाशिकमधील पक्षांतर्गत बदलामुळे मी माझ्यावरच नाराज आहे, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. इथं हे लक्षात घ्यायला हवं की राऊत हे ठाकऱ्यांच्या शिवसेनेचे नाशिक संपर्क प्रमुख आहेत. विशेष म्हणजे राऊत नाशकात असताना बडगुजर मात्र मुख्यमंत्री फडणवीसांकडे काही मागण्यांचं पत्र घेऊन गेले होते. या सर्वच घडामोेडींमुळे महाजनांच्या टीकेवरुन एक प्रश्न उपस्थित होतो...
All Shows

































