Zero Hour : संजय निरूपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; महायुतीत जाणार ?
Zero Hour : संजय निरूपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; महायुतीत जाणार ? Zero Hour : संजय निरूपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; महायुतीत जाणार ? एक जहाज असतं, अचानक आलेल्या वादळामुळे ते प्रचंड हेलकावत असतं... चारी बाजूने अंगावर धावून येणाऱ्या प्रचंड आक्राळ-विक्राळ लाटा आणि कर्णकर्कश आवाज... आणि ढगांचा गडगडाट... आता आपलं काय होणार? या भीतीने जहाजावरील प्रत्येक सैनिक चिंतेत होता... आणि इतक्यात सगळ्यांना दिसला तो, खंबीरपणे उभा राहिलेला कॅप्टन.. तो मनाने खचला होता की नाही माहीत नाही, पण त्याचं फक्त खंबीरपणे उभं राहणंच, सैनिकांना नवी ऊर्जा देऊन गेलं... मंडळी, तुम्ही म्हणाल झीरो अवरमध्ये तुम्ही आज ही गोष्ट का सांगताय... पण त्याचा काहीसा संबंध आज एकनाथ शिंदेंच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याशी आहे... आता तो कसा हे ऐकायला आपल्याला एकनाथ शिंदेंबरोबर जायचंय यवतमाळ -वाशीमला तर देवेंद्र फडणवीसांबरोबर जायचंय अमरावतीला. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या बाजूला दोन्ही नेते उभे राहिले... उमेदवार बदल आणि प्रचंड विरोधाच्या संकटातही आपण तुमच्यासोबत खंबीर आहोत, हे दाखवण्यासाठी... अगदी गोष्टीत सांगितलेल्या जहाजावरच्या कॅप्टनसारखे... मात्र, भागाची सुरुवात काँग्रेसला बसलेल्या आणखी एक धक्क्याची.. म्हंटलं तर धक्का.. म्हंटलं तर धक्का नाही.. काऱण, मुंबई काँग्रेसचे बडे नेते संजय निरुपम यांना पक्षानं निलंबीत केलं.. त्याआधीच आपण पक्षाचा राजीनामा दिल्याचं खुद्द निरुपमांनी सांगितलंय.. आणि आज निरुपमांनी काँग्रेस पक्षावर नेमके कोणते आरोप केलेत