Zero Hour : वायनाडमध्ये काँग्रेससमोर मित्रपक्षाचं आव्हान; राहुल गांधी मेगारॅलीत सहभागी
Zero Hour : वायनाडमध्ये काँग्रेससमोर मित्रपक्षाचं आव्हान; राहुल गांधी मेगारॅलीत सहभागी केरळमधून.. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांचा वायनाड मध्ये मोठा रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची बहिण प्रियंका वाड्रा सुद्धा उपस्थित होत्या.. राहुल गांधींनी २०१९ साली अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. सुरक्षित मतदार संघ म्हणून या वायनाड मतदारसंघाची त्यांनी निवड केली होती. त्याचा फायदा झाला. अमेेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला मात्र वायनाडमधून ते चांगल्या मताधिक्यानं निवडून आले होते. यावेळी दुसऱ्या टर्मसाठी ते नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ऍनी राजा यांचं आव्हान असेल. त्या भाकपचे सरचिटणीस डी. राजा यांच्या पत्नी आहेत.