Zero Hour पुण्यात शरद पवारांचा बैठकांचा धडाका इच्छुकांची रीघ Sharad Pawar Meetings
Zero Hour पुण्यात शरद पवारांचा बैठकांचा धडाका इच्छुकांची रीघ Sharad Pawar Meetings आता शरद पवारांना भेटणाऱ्यांमध्ये कोण-कोण नाराज आहे.. आणि का नाराज आहे.. आणि ते शरद पवारांनाच का भेटातायेत... हे महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची गरज नाहीय.. पण, महायुतीत नाराज म्हणून मविआत जाण्याऱ्यांना तिकीटं मिळणार का? आणि त्याचा काही फायदा होणार का? हा विश्लेषणाचा मुद्दा आहे.. मात्र, जे नाराजी नाट्य महायुतीतच दिसतंय.. तेच नाराजी नाट्य महाविकासआघाडीतही आहे..
मविआत मिठाचा पहिला खडा पडलाय.. तो सांगलीत.. इथल्या जागेवर उद्धव ठाकरेंनी आपला गडी जाहीर केला.. तर काँग्रेसनंही इतिसाहाचा वारसा देत जागा आमचीच असल्याचं जाहीर केलं.. वाटलं राज्यात संघर्ष सुटेल.. मात्र, तसं अजूनतरी झालंय असं वाटत नाही ... प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आज सकाळी दिल्लीत पोहोचले.. आणि थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुक खर्गें यांच्यासमोरच सांगलीची गोष्ट सांगितली.. तर संध्याकाळचे हे विसुअल्स बघा .... नाना धावताना दिसत आहेत .... उशीर झाल्यामुळे सोनिया गांधी उपस्थित असणाऱ्या आज संध्याकाळच्या बैठकीला त्यांना धावत धावत गाठावे लागले. आता ह्याच बैठकीत सांगलीच्या जागेवर काँग्रेस अंतिमतः काय निर्णय घेते ... बॅक फूट वर जाते कि आक्रमक राहते ... ह्या बातमीसाठी आम्ही सुद्धा तुमच्यासह थांबलो आहोत ... कारण ह्या सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होईल का हे पण अवलंबून आहे .... त्यामुळे दिल्लीतून हायकमांड महाराष्ट्र काँग्रेसला कोणता आदेश देईलय.. याकडे लक्ष आहे..