एक्स्प्लोर

Zero Hour Pune Accident : अजय तावरे ते पटोलेंचें आरोप; पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या चार गोष्टी

नमस्कार मी सरिता कौशिक.. झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. पुण्यातील पोर्शा कार अपघाताला आज बरोबर ११ दिवस पूर्ण झालेत.. गेल्या अकरा दिवसांमध्ये या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येतात ... आणि त्याला राजकीय किनार आहे.. खरं तर त्यातील काही बातम्यांना खुलासा म्हणायचे कि आरोप ... हे सुद्धा ठरवावे लागेल. सुरुवातीला आजचे हायलाईट्स..

पहिली गोष्ट - रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टरांवरची कारवाई...
ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सादर झालाय .आणि संध्याकाळी मंत्री हसन मुश्रीफांनी डॉक्टर अजय तावरेंसह त्याचबरोबर कंत्राटी डॉक्टर श्रीहरी हळनोरचं निलंबन केलं.. इतकंच नाही तर . ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळेंनाही सक्तीच्या रजेवर धाडलंयय.. आणि शिपाई अतुल घटकांबळेचं निलंबन आलंय...

तर आजची दुसरी गोष्ट - मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलिस आयुक्तांना कठोर आदेश..

पोर्शा दुर्घटना झाल्यापासून खास करून आधीच्या टप्प्यात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर अनेक आरोप झालेत.. आज पुणे पोलिस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी फोन करत आरोपी कोणीही असेल.. किती मोठा असेल तरी योग्य ती कारवाई करा असे आदेशच दिलेत.. तर तिकडे पुणे पोलिसांची एक टीम ससूनमध्ये दाखल झाली.. त्यांनी तिथं तपासही केलाय.. आणि एक महत्वाची बाब समोर आली. ... अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी आरोपीचे वडील विशाल अगरवालने डॉ. अजय तावरेला १४ कॉल्स केल्याचे उघड झाले. ....

प्रकरणातली तिसरी गोष्टी - डॉक्टर अजय तावरेंचा गंभीर इशारा आणि त्यांच्यावरचे आणखी धक्कादायक प्रकरण...
विरोधक असो की शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्राचा अग्रलेख... सगळ्यांनी एक सुरात ससूनचे डॉक्टर अजय तावरे... यांनी चौकशीदरम्यान दिलेला जबाबाचा उल्लेख केलाय.. ‘मी सगळ्यांची नावे जाहीर करीन’ अशी धमकीच डॉक्टर अजय तावरेंनी दिलीय..असा उल्लेख अग्रलेखात करण्यात आलाय... तर अजय तावरेेंचा आणखी एक धक्कादयक प्रताप समोर आलाय.. ते तर बघायचे आहेच मात्र त्याच बरोबर डॉक्टर तावरेंचा करियर रिपोर्ट हा वेगवेगळ्या वेळी कसा डागाळलेला हेही आजच्या भागात पाहणार आहोत..

आता आजची चौथी गोष्ट - नाना पटोले आणि सुषमा अंधारेंचे गभीर आरोप...
आपल्याकडील पुरावे आणि आणखी काही जणांची नावं उघड करु असा धमकी वजा इशारा देणाऱ्या डॉक्टर तावरेंच्या जीवाला धोका आहे असं म्हणत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी डॉक्टर तावरेंच्या सुरक्षेची मागणी केलीय.. ह्या प्रकरणाला अजून एक राजकीय कलाटणी देत सुषमा अंधारेंनी रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाच्या आडून भाजपला अजित दादा आणि शिंदे गटापासून फारकत घ्यायची आहे असाही दावा केलाय.. पाहुयात

((PLAY ANDHARE 3WB))

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget