Zero Hour on Private Hospital : सतत लुटीच्या तक्रारी, आरोग्य व्यवस्था पारदर्शी कधी होणार?
Zero Hour on Private Hospital : सतत लुटीच्या तक्रारी, आरोग्य व्यवस्था पारदर्शी कधी होणार?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशाअभावी एका महिलेचा जीव गेल्याची घटना घडली. त्यानंतर या रुग्णालयाला जमीन दान केलेल्या पुण्यातील खिलारे कुटुंबीयांबद्दल सोशल मीडियामध्ये एक पोस्ट फिरत आहे. भाऊसाहेब खिलारेंनी शरद पवारांच्या सांगण्यावरुन लता मंगेशकरांना रुग्णालयासाठी जमीन दिली होती. या सगळ्या घटनेवर आता खिलारे कुटुंबीयातील वारस चित्रसेन खिलारे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी या रुग्णालयाबद्दल खिलारे कुटुंबीयांना आलेले अनेक चांगले-वाईट अनुभव सांगितले.
लता मंगेशकरांना ही जागा कशी दिली?
चित्रसेन खिलारे म्हणाले की, "बाळासाहेब खिलारे यांच्या डेक्कन परिसरात मोठ्या होत्या. सामाजिक संस्थांसाठी त्या मोठ्या प्रमाणात दान करण्यात आल्या होत्या. 1989 साली लता मंगेशकरांनी रुग्णालयासाठी जमीन मागितली. लता मंगशकरांनी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी भाऊसाहेबांना जागेसाठी विचारलं. तुमच्या अनेक जागा या सामाजिक कार्यासाठी वापरल्या गेल्या आहेत, आता गरिबांसाठी एक रुग्णालय उभा राहत असेल तर ती चांगली गोष्ट आहे असं पवारांनी सांगितलं."
All Shows

































