Zero Hour : Nashik Corporation : महापालिकेचे महामुद्दे : रामकुडांचं काँक्रिटीकरण वादाचा मुद्दा?
नाशिक शहरात २०२७ साली सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवा वाद सुरू झालाय. नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या पट्ट्यात अजूनही काही भाग काँक्रिटचा आहे.. म्हणजे नदीच्या तळाशी नैसर्गिक माती किंवा खडी नसून काँक्रिट आहे. हे काँक्रिट काढून टाकण्यात यावं अशी मागणी
पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. आणि पुरोहित संघाचा त्याला ठाम विरोध आहे. पण मुळात हे काँक्रिटीकरण का करण्यात आलं, आणि आता ते काढण्याची मागणी का होतेय? हे जाणून घेण्यासाठी पाहूयात महापालिकेचे महामुद्देमधला स्पेशल रिपोर्ट.
२००३मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडला. त्याची तयारी म्हणून २००२ मध्ये गोदावरीच्या तळाचं काँक्रिटीकरण करण्यात आलं
रामकुंड, लक्ष्मण कुंडासह एकूण दोन किलोमीटरच्या पट्ट्यात नदीच्या तळाशी काँक्रीट टाकण्यात आलं
कुंभमेळा संपल्यावर हे काँक्रीट काढणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही
काँक्रीटच्या खाली अनेक झरे दबले गेलेत ही बाब २०१४ साली काही इतिहासकारांनी लक्षात आणून दिली.
All Shows


































