Zero Hour : मविआवर संघर्षाचे ढग ते लोकसभा निवडणुकीसाठी दिग्गजांनी भरला अर्ज
Zero Hour : मविआवर संघर्षाचे ढग ते लोकसभा निवडणुकीसाठी दिग्गजांनी भरला अर्ज क्षणाक्षणाला आज राजकीय पटलावर महाराष्ट्रात काहीतरी घडत होतं ... सकाळच मुळात सुरु झाली ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 17 उमेदवारांच्या यादीने. आणि महाविकास आघाडीची एकजटू फुटली.. असं का म्हणतेय हे तर सांगेनच पण अजून एक सांगते कि येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीचंच नाही, तर आता वंचित बहुजन आघाडीचंही आव्हान असणारय.. नीट ऐकलंत ना.. आता तुम्ही म्हणाल की मविआत तर प्रकाश आंबेडकरांची एन्ट्री होणार होती.. त्यावरुन अनेक बैठकांमधून विचार मंथन सुरु होतं.. अगदी कालपर्यंत नव्याने प्रस्ताव गेला होता ... जागावाटपावरुन चर्चा सुरु होत्या.. मग त्याचं काय झालं.. तर तेही आपण आजच्या झीरो अवरमध्ये पाहणार आहोतच.. जिथं सांगलीवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये संघर्षाचा वणवा पेटलाय... तिथं महायुतीमध्येही एकाजागेवरुन असाच संघर्ष पेटू शकतो.. ती जागा आणि तिथले दावेदार हेही आपण पाहणार आहोतच..