Zero Hour | क्रिकेट समालोचनासाठी 'मराठी'चं का वावडं? मनसेचं पुन्हा एकदा खळखट्याक?
Zero Hour | क्रिकेट समालोचनासाठी 'मराठी'चं का वावडं? मनसेचं पुन्हा एकदा खळखट्याक?
प्रत्येक क्रिकेटरसिक आपल्या भावना या आपल्या भाषेतच मोकळेपणानं व्यक्त करतो.. आणि हे जसं मराठी चाहत्यांचं होतं.. तसंच देशातल्या कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या चाहत्याचं होतं.. आणि हाच प्रादेशिक भाषांमध्ये व्यक्त होणारा क्रिकेटचा प्रेक्षक मोठा आहे.. हेच लक्षात घेऊन.. विविध क्रीडावाहिन्यांनी प्रादेशिक भाषांमध्ये समालोचन सुरु केलं.. प्रामुख्यानं आयपीएलच्या निमित्तानं क्रीडावाहिन्यांवर प्रादेशिक भाषांमध्ये समालोचन सुरु झालं.. पुढे आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीही तो प्रयोग सुरु राहिला... आता हेच बघा ना.. त्यातच डिजिटल युगात ओटीटीमुळे हे करणं आणखी सोप्पं बनलं होतं.. एकाच स्टुडिओतून वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन शक्य झालं होतं.. त्यामुळं त्या त्या वाहिन्यांनी हे प्रयोग केले.. ते ते चांगलेच चर्चेत आले... त्यामुळं जवळपास सगळ्याच ओटीटी आणि क्रीडावाहिन्यांनी प्रादेशिक भाषांमधून क्रिकेट, फुटबॉल आणि कबड्डीसारख्या खेळांच्या मालिकांचं समालोचन पुढेही सुरु ठेवलं... पण, याच प्रादेशिक भाषांच्या मार्केटमध्ये हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मनं एक निर्णय बदलला आणि वादाची ठिणगी उडाली... गोष्ट आहे भारत-इंग्लंड संघांमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेची... या मालिकेचे पाचपैकी दोन सामने झालेत.. पण या अख्ख्या मालिकेत तो निर्णय लागू होता. आणि तो होता.. सामन्याचं समालोचन मराठी भाषेतून न करण्याचा.... आणि तोच मुद्दा हातात घेतला.. महाराष्ट्र निर्माण सेनेनं... भारत-इंग्लंड मालिकेचं समालोचन हरयाणवी आणि भोजपुरी भाषेतूनही केलं जात आहे, पण हॉटस्टारचं कार्यालय महाराष्ट्राच्या मुंबईत असूनही मराठी भाषेतून समालोचन का नाही... असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हॉटस्टारचं ऑफिस गाठलं.... आणि खळखट्याकचा ट्रेलरच दाखवला...
All Shows

































