(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour : उमेदवारांची अदला बदली ; लोकसभेच्या जागांवरून जोरदार रस्सीखेच
Zero Hour : उमेदवारांची अदला बदली ; लोकसभेच्या जागांवरून जोरदार रस्सीखेच महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्वाच्या घडामोडींचा ठरलाय... असं म्हणतोय.. कारण, काही मिनिटांपूर्वी आल्या दोन महत्वाच्या बातम्या .... पहिली बातमी ... हिंगोलीमध्ये शिवसेनेनं उमेदवार बदलाय.. होय ... होय ... तुम्ही बरोबर ऐकलंत ... आम्ही तुम्हाला सांगत होतो तेच घडलं ... हिंगोलीत शिवसेनेने उमेदवार घोषित केला होता ...आणि आज तो बदलला तर दुसरी मोठी बातमी ...ती हि शिवसेनेचीच ... यवतमाळ-वाशिमध्येही विद्यमान खासदार भावना गवळींचं तिकीट कापलंय.. कोण आहे नवा उमेदवार ते हि पाहणार आहोत आणि हे हि पाहणार आहोत कि एका दगडात शिवसेनेनं दोन पक्षी कसे मारले. हि सगळी कसरत सुरु आहे.. कारण. सगळ्यांचं लक्ष एकच.. लोकसभा २०२४... राज्यातल्या 48 पैकी तीस एक जागांवर लढती स्पष्ट झाल्यात.. काही अत्यंत रंजक आहेत.. तर काही चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.. तर काही एकदम नेक टू नेक फाईट्सही होण्याची शक्यता विश्लेषकांकडून वर्तवण्यात येतीये.. असं असलं तरी मात्र, दुसरीकडे दहा एक जागा अशा आहेत.. जिथं महाविकास आघाडी असो की महायुती.. दोन्ही बाजूला काही जागांवरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.. याचसंदर्भातल्या आज दिवसभरात घडलेल्या सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला सागंणार आहे.. पण, सुरुवात करुयात कोकणातील अत्यंत महत्वाच्या बामतीनं.. शिवसेना आणि कोकण.. हे राजकीय गणित आपण आजच्या भागात समजून घेणार आहोत.. आणि आजच्या याच चर्चेला कारण ठरलाय रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरुन महायुतीत सुरु झालेला संघर्ष... तो आपण समजून घेणार आहोतच.. मात्र त्याआधी पाहुयात आजचा प्रश्न.. त्यासाठी जावूयात पोल सेंटरला..