एक्स्प्लोर

Zero Hour Harshvardhan Patil : सुळेंना अदृश्य मदत, हाती तुतारी ते इंदापूरची उमेदवारी

इंदापुरातील मार्केट कमिटीच्या मैदानातला हा सोहळा... अनेक राजकीय अर्थांनी महत्वाचा आहे. पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी जवळून पाहिलंय. त्यांच्यासाठी इंदापूरचे शंकरराव पाटील हे नाव नवं नाही. महाराष्ट्रातही सहकार क्षेत्रात याच शंकरराव पाटलांचं नाव होतं.. दोन वेळा खासदार, सहा टर्म आमदार... कट्टर काँग्रेसी... अशी त्यांची ओळख.. बारामतीचे शरद पवार आणि इंदापूरचे शंकरराव पाटील... एकाच विचारसरणीचे नेते.. पण.. शंकरराव पाटलांना खुद्द शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत दोनवेळा पराभूत केलंय.. पाटील-पवार घराण्यात चार दशकांचा संघर्ष होता.. प्रामुख्यानं लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रानं हा संघर्ष अनेक वेळा पाहिलाय.. 
पुढे पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली.. आणि काँग्रेसमध्येच राहिलेल्या शंकररावांचा राजकीय वारसा त्यांच्या पुतण्याच्या खांद्यावर आला.. आणि तो पुतण्या म्हणजे हर्षवर्धन पाटील. 
तेच हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून व्हाया भाजप आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले आहेत.. त्यांच्या स्वागतासाठी शंकरराव पाटलांच्या पुतळ्यासमोरच्या मैदानात शरद पवार उपस्थित होते. आज एक अख्खं राजकीय वर्तुळ पूर्ण झालंय.. 
हर्षवर्धन पाटलांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असताना... अनेक गौप्यस्फोट केले... जसा की... नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका... तेव्हा हर्षवर्धन भाजपमध्ये होते.. त्यांचा इंदापूर मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये मोडतो.. आता अपेक्षित होतं.. की हर्षवर्धन पाटलांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना मदत करणं अपेक्षित होतं.. पण, निकालानंतर कळलं की हर्षवर्धन पाटलांच्या इंदापुरातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना २५ हजारांची आघाडी मिळाली... 
तेव्हा याची फार चर्चा झाली नाही... पण, आज इंदापुरातील सोहळ्यात... खुद्द हर्षवर्धन पाटलांनीच यावर मोठा खुसाला केला.. लोकसभेत बारामतीमधून सुनेत्रा पवारांविरोधात सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटील यांनी केला.... आणि शरद पवार हेच राजकारणाचे बिग बॉस असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget