Zero Hour : विधान परिषद निवडणुकीसाठी जागा 11 उमेदवार 12 ; कुणाचा उमेदवार पडणार?
Zero Hour : विधान परिषद निवडणुकीसाठी जागा 11 उमेदवार 12 ; कुणाचा उमेदवार पडणार?
विधान परिषद निवडणूक स्पेशल यासाठी म्हणतोय.. कारण, आजच्या भागात आपण विश्लेषण करणार आहोत... अवघ्या काही तासांवर आलेल्या विधान परिषद निवडणुकीचं... बरोबर चोविस तासांनंतर राज्यातल्या अकरा विधान परिषदेच्या जागांचा निकाल लागलेला असेल.. आणि महायुती असो की महाविकास आघाडी... यांच्यातला एक उमेदवार पराभुत झालेला असेल..
खरंतर, एक काळ होता.. खऱंतर, विधान परिषद असो की राज्यसभा.. दोन्ही सभागृहातील निवडणुका शक्यतो बिनविरोध व्हायच्या.. या निवडणुकांसाठी लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क असल्यानं.. यात इतके डावपेच आखले जायचे नाही.. राजकीय पक्षांच्या आमदारांच्या संख्येवरुन त्यांच्या विधान परिषदेत किंवा राज्यसभेतल्या जागांचा आकडा ठरायचा.. याच बिनविरोध निवडणुका जणू आपल्या समृद्ध राजकीय परंपरेचाच भाग बनल्या.. मात्र, आता काळ बदलल्या.. एक-एक मतासाठी राजकीय डावपेच आखले जावू लागले..आताही राज्यात असंच चित्र आहे.. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह ठाकरेंनी आपले आमदार हॉटेल्समध्ये ठेवलेत.. कारण, इथं एक-एक मताला महत्व आहे..
गेल्या पाच वर्षांमध्ये राजकीय गणितं इतकी बदलून गेलीएत.. गेल्या विधानसभेला राज्यात जिथं सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी असे चार प्रमुख पक्ष होते.. तिथ आज दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक भाजप, एक काँग्रेस.. असे सहा प्रमुख पक्ष बनलेत..
त्यामुळे राज्यात ग्रामपंचायतीच्याही निवडणुका लागल्या.. तरी त्या प्रतिष्ठेच्या बनतात... आणि हेच आपण गेल्या अडीच वर्षांमध्ये पाहतोय...आणि त्याला विधान परिषदेच्याही निवडणुका अपवाद उरल्या नाहीएत.
त्यातच लोकसभा निवडणुकांचा निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय.. त्यामुळे मविआनं तीन उमेदवार रिंगणात उभे केलेत.. आणि महायुतीनं नऊ उमेदवार मैदानात उतरवलेत.. त्यामुळे मतांची गणितं नक्कीच बदलली आहेत.. आणि हीच गणितं आपण समजून घेणार आहोत... परिषेदच्या निवडणुकांसंदर्भातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आपल्यासोबत असणार आहेतच.. त्यांच्याशीही चर्चा करायची आहे.. मात्र, त्याधी पाहुयात आजचा पहिला प्रश्न.. त्यासाठी जावूयात पोल सेंटरला..