Zero Hour Full : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआ एकीची गुढी उभारणार?
Zero Hour Full : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआ एकीची गुढी उभारणार?
आज एका दिवसात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी.. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी विदर्भात महायुतीच्या उमेदावारांसाठी मेगरॅलीजला संबोधित केलं.. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.. शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार... ठाकरेंचे खासदार संजय राऊत.. अशी राज्यातल्या सगळ्याच बड्या नेत्यांची फौजही.. भर उन्हात प्रचाराचा सभा गाजवतायेत..
पण, उन्हाच्या अल्टिमेटमध्ये गाजणाऱ्या सभांपेक्षा जास्त... चर्चा सुरु आहे.. ती एका अशा अल्टिमेटमची.. ज्यावरुन महाविकास आघाडी दिशा ठरणार आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एकजूट संकटात आलीय ...
त्यात सांगलीच्या जागेचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाहीय. आज उद्या म्हणत.. गेल्या तीन आठवड्यांपासून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झालाय. तोच संघर्ष दिल्ली दरबारीही पोहोचलाय. आणि आता त्याच संघर्षावर उद्यापर्यंत तोडगा काढावा.. असा अल्टिमेटमच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिलाय.. असं म्हणावं लागेल.. कारण, उद्याच्या गुढीपावड्याच्या मुहूर्तावर मविआची संयुक्त पत्रकार परिषद आहे.. त्यात तिन्ही पक्षांना एकजूट दाखवावी लागेल ...उमेदवार जाहीर करावे