Zero Hour Full EP : पहलगाम हल्ल्यानंतर धर्माची चर्चा का? शरद पवार यांचं वक्तव्य, झीरो अवरमध्ये सखोल चर्चा
Zero Hour Full EP : पहलगाम हल्ल्यानंतर धर्माची चर्चा का? शरद पवार यांचं वक्तव्य, झीरो अवरमध्ये सखोल चर्चा
भारतीय जनहिताची चर्चा आहे. कारण काल आपण चर्चेमध्ये एक वाक्य वापरलं होतं ते म्हणजे लष्कर काय ते बघून भारतीय लष्कर जी सीमेच्या पलीकडे पाकिस्तानशी काय करायचा तो फ्रंट आपला लष्कर बघायला समर्थ आहे आणि सरकार आणि त्याला आता पाठींबा देणारे सगळे विरोधी पक्ष एक दिलान पाकिस्तानच काय करायच बघायला आपले विरोधी पक्ष आपलं सरकार आपलं सैन्य सक्षम आहे. पण ती एक किंवा दोन फ्रंट्स असतील जास्तीत जास्त, कुठल्या ठिकाणी ओपन होतील त्या, पण भारतामध्ये इतक्या सगळ्या राज्यांमधल्या एवढ्या कोटेवदी लोकांच्या मेंदूतल्या फ्रंटच काय करायचं? कारण त्या तिथे नवीन युद्ध सुरू होणार आहे आणि पाकिस्तानी सैन्याला ते हवं आहे, आयएसआयला ते हवं की भारतीयांच्या डोक्या डोक्यामध्ये एक नवीन युद्ध सुरू झालं पाहिजे की तुमचा कोण आणि आपला कोण, खरा भारतीय कोण, खोटा भारतीय कोण, छुपा कोण आणि अस्सल कोण, देशभक्त कोण, देशद्रोही कोण आणि याच्यामुळे? हत्या केली या एका वाक्याला मुळामध्ये ते एक वाक्य असं नसून ती सगळी परिस्थिती आहे हिंदूंना तिकडे निवडून निवडून मारण्यात आलं हे वास्तव आहे एक मुसलमान जो तिकडचा घोडेस्वार होता जो घोड्याची सेवा देत होता तो आडवायला गेला होता आणि त्याच्या त्याचा जीव गेला मात्र प्रामुख्याने ते अतिरेखी दहशतवादी मारायला आले होते किंवा त्यांनी निवडून मारल ते हिंदूना हे वास्तव आहे. हे होत असताना आता त्याचा दोन्हीकडून वापर सुरू होतो जे हिंदुत्ववादी आहेत प्रो भाजप आहेत किंवा सरकार. चर्चा का? तर आता शरद पवार काय म्हणाले ते आपण आधी ऐकूया आणि त्यानंतर ज्यांच असं म्हणे की धर्म वगैरे काही बघितलेला नाही असं काही झालेलच नाही त्यांच्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये असेच या हल्ल्याला बळी पडलेले काय सांगतात शरद पवारांच्या उपस्थिती ही दोन्ही बाईट्स आपण ऐकूया पाहूया
सरकार म्हणायचं दहशतवाद मोडून काढलाय, पण...
सरकारने हे अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे. गेले काही दिवस सरकारच्या वतीने सतत सांगितले जात होते. आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. आता काय चिंता नाही. असं होत असेल तर आनंद आहे. पण घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे हे स्पष्ट आहे. ही कमतरता सरकारने घालवायला हवी. सरकारने अधिक गांभीर्याने घ्यावे. सरकार कमतरता आहे हे मान्य करत असेल तर त्यांनी तातडीने पावले टाकावीत. काही कामात आम्हा लोकांचं सहकार्य राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आपण काळजी घ्यायला पाहिजे
शरद पवार पुढे म्हणाले की, इंटेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसत आहे. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. दोन-तीन महिन्यापूर्वीच मी तिथे जाऊन आलो. सातत्याने आपले लोक तिथे जातात. दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावधान करणारा आहे. आपण काळजी घ्यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तर पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे? याबाबत मला माहिती नाही. पण तिथं जी लोक होते, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसते आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
All Shows




























