Zero Hour | महाराष्ट्रात राजकीय भूकंप? Eknath Shinde यांचं 'ऑपरेशन टायगर' अंतिम टप्यात?
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होणार असं दिसतंय. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकदोन नाही सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय... केंद्रातही भाजपची सत्ता असणं... आणि त्यामुळं निधी मिळण्यात अडचणी येण्याची भीती ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं सांगण्यात येत आहे...
यावर कुणाच्या मनात असाही विचार येऊ शकतो की हा आकडा सहाच का आहे. त्याचं कारण असं की पक्षांतर बंदी कायद्यातून सुटण्यासाठी किमान दोन तृतीयांश आमदार किंवा खासदारांना एकाच वेळी पक्ष सोडावा लागतो. विद्यमान लोकसभेत ठाकरेंचे नऊ खासदार आहेत. नऊ या संख्येच्या त्याच्या दोन तृतीयांश म्हणजे संख्या येतो सहा.
ठाकरेंच्या शिवसेनेनं ही चर्चा खोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं खासदार मंडळी नवी दिल्लीत आहेत. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी चर्चा खोडून काढण्यासाठी घाईघाईनं पत्रकार परिषद घेऊन आपल्यातली एकी दाखवली. आमच्यातला एकही खासदार फुटणार नाही, आम्ही सगळे ठाकरेंचे निष्ठावंत सैनिक आहोत असं हे खासदार सांगत होते.
शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना मात्र हे मान्य नाही. सहा खासदार तर येतीलच, त्याशिवाय येत्या तीन महिन्यांमध्ये १० ते १२ माजी आमदार आमच्यासोबत येतील असा दावा उद्योगमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे बडे नेते उदय सामंत यांनी केला आहे.
या विषयावरील राजकीय प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत, तसंच या विषयावर सविस्तर चर्चाही करणार आहोत. पण त्याआधी वेळ झालीय आजचा प्रश्न पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला.
All Shows

































