Zero Hour : आधी फडणवीस नंतर विरोधी पक्षनेते राज्यपालांच्या भेटीला; नेमकी चर्चा काय ?
Zero Hour : आधी फडणवीस नंतर विरोधी पक्षनेते राज्यपालांच्या भेटीला; नेमकी चर्चा काय ? पावसाळी अधिवेशनातील आजचा दिवस जसा बच्चू कडू यांच्या य़ा वक्तव्यानं गाजला.. तसाच तो गाजला आणखी दोन गोष्टींनी.. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे.. राजभवनावर वाढलेल्या हालचाली.. आणि दुसरी गोेष्ट म्हणजे वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील सर्वात मोठी अटक.. दोन्ही बातम्याचं विश्लेषण करुयात.. पहिले जावूयात राजभवनात.. आज राज्यपालांच्या भेटीला आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. आणि नंतर प्रमुख विरोधी पक्षनेते पोहोचले.. देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीत विधानपरिषदेच्या सभापती निवडीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.. कारण, याच अधिवेशनात सभापती निवड करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.. २०२२ साली रामराजे नाईक निंबाळकर सभापतीपदावरुन निवृत्त झाले होते.. तेव्हापासून विधान परिषदेचं सभापतीपद रिक्त आहे... फडणवीसानंतर आजच दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही राज्यपालांची भेट घेतली.. विधानपरिषदेच्या सभापतीची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलीय... त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार.. याकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं लक्ष लागलंय. आता दुसरी बातमी... वरळी हिट अँड रन प्रकरणात आज पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक केलीय... याआधीच मिहीर शाहाची आई, वडील, बहीण.. असे सगळे कुटुंबीय अटकेत आहे.. अपघातानंतर मिहिर फरार झाला होता.. त्याचा आज शहापूरमधून अटक करण्यात आलीये.... तिकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करत जुहूच्या वाईस ग्लोबल तापस बारला सील केलं.. याच बारमध्ये मिहिर शाह पार्टी करुन मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता.. याच मिहिर शाहांच्या हिट अँड रन प्रकरणाचे पावसाळी अधिवेशनातही पडसाद उमटले.. गेल्या काही दिवसांमधल्या घटनांचा आधार घेत.. मिहिर शाहावरुन आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर घणाघाती आरोप केलेत.. फक्त हिट अँड रन म्हणून या वरळी प्रकरणाकडे न पाहता यावर हत्येचं प्रकरण म्हणून गुन्हा नोंदवला पाहिजे.. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली..