Zero Hour CM Eknath Shinde Exclusive : मिसळीवर ताव, राजकीय गप्पा, मुख्यमंत्र्यांशी Exclusive संवाद
Zero Hour CM Eknath Shinde Exclusive : मिसळीवर ताव, राजकीय गप्पा, मुख्यमंत्र्यांशी Exclusive संवाद
राज्यातली आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या २० दिवसांवर आलीय. या निवडणुकीच्या तोंडावर आलेली दिवाळी राज्यातल्या प्रमुख राजकीय नेत्यांसाठी जणू वेलकम ब्रेकसाठी आहे. राज्यातल्या २८८ विधानसभा मतदारसंघांमधला तिढा सोडवणं ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी जणू कसोटीच होती. पण गोष्ट तेवढ्यावरच थांबणारी नव्हती. आपापल्या पक्षासाठी यशस्वी वाटाघाटी करून जास्तीत जास्त जागा मिळवणं, मग तीनचार पर्यायांमधून जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराची निवड करणं,
तिकीट मिळालेल्या उमेदवारांना वेळेत एबी फॉर्म पोहोचवणं, तिकीट न मिळालेल्या किंवा कापण्यात आलेल्या नाराज मंडळींची समजूत घालणं हे सारं शारीरीक आणि मानसिकदृष्ट्याही खूप थकवणारं होतं. त्यामुळं दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या कुटुंबीयांसोबत राहून किंवा आपापल्या मतदारसंघात फेरफटका मारून रिफ्रेश होण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाणे शहर हे तलावांइतकंच तिथल्या मिसळीसाठीही ओळखलं जातं. मुंबई-ठाण्यातील राजकीय नेतेमंडळी सध्या ठाण्यातली मिसळ खाऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवताना दिसतायत. राज ठाकरेंनी नुकताच ठाण्यात येऊन आपल्या आवडत्या मामलेदार मिसळीचा झणझणीत आस्वाद घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आज नौपाड्यातल्या गोखले उपाहारगृहात मिसळ खाण्याचा आनंद लुटला. मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमातून मिळालेला फावला वेळ लक्षात घेऊन माझा सहकारी अक्षय भाटकरनं त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी साधली.