World Coconut Day 2021 : Ratnagiri च्या नारळ संशोधन केंद्राची यशोगाथा 'माझा'वर : ABP Majha
World Coconut Day 2021 : नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. त्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळ हा त्यापैकीच एक. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, ओषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या शेतीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे. त्यामुळे नारळाचे महत्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक नारळ दिन हा सर्वप्रथम 2009 साली एशिया-पॅसिफिक प्रदेश म्हणजे आशिया-प्रशांत महासागराच्या प्रदेशातील समुदायाकडून साजरा करण्यात आला. जागतिक स्तरावर नारळाच्या शेतीबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा उद्देश जागतिक नारळ दिन साजरा करण्यामागे आहे. त्यामुळे नारळाच्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल.
जगभरात नारळाचे उत्पादन घेतले जाते, पण आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. नारळाच्या उत्पादनाच्या बाबतीत इंडोनेशियाचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतातही कोकण किनारी, गुजरात पासून ते केरळपर्यंत आणि पूर्व किनाऱ्याच्या पश्चिम बंगालपासून ते तामिळनाडूपर्यंत नारळाचे उत्पादन घेतलं जातं.
जागतिक नारळ दिन साजरा करताना दरवर्षी एक थीम आखली जाते. या वर्षीच्या जागतिक नारळ दिनाची थीम ही “Building a Safe Inclusive Resilient and Sustainable Coconut Community Amid COVID-19 Pandemic & Beyond“ अशी आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या काळात एक शाश्वत नारळ समुदाय निर्माण करण्याचं ध्येय आहे.