5 G Service Special Report :5 जी नेटवर्कचे फायदे आणि तोटे काय? ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 5 जी सेवेचा शुभारंभ केला. वीज, पाणी आणि गॅस घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार सरकारनं केला, तसंच सर्वांसाठी इंटरनेट देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. डिजिटल इंडिया विकासाचं सर्वात मोठं व्हिजन आहे, असं सांगतानाच, भारत नव्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्लीतल्या प्रगती मैदानात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. या प्रदर्शनातच त्यांनी देशातल्या ५ जी सेवेचा शुभारंभ केला. आज अहमदाबाद आणि वाराणसीमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात येत्या काही दिवसात मुंबई आणि पुण्यासह १३ शहरांत ही सेवा सुरु होणार आहे.
All Shows































