(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Kedar Special Report : सुनील केदार यांच्या रिक्त जागेसाठी निवडणूक?
तब्बल 22 वर्षे चाललेल्या बँक घोटाळ्याच्या प्रकरणात सुनील केदार दोष सिद्ध झाले.. त्यांना विविध कलमान्वये वेगवेगळ्या कालावधीची शिक्षा सुनावली गेली.. मात्र, त्या सर्व शिक्षा सोबतच भोगायच्या असल्यामुळे आणि सर्वाधिक शिक्षा पाच वर्षाची असल्यामुळे केदार यांना पाच वर्ष तुरुंगात राहावे लागण्याची शक्यता आहे... दरम्यान, शिक्षा होताच तब्येत बिघडल्यामुळे केदारांनी 22 डिसेंबरच्या रात्रीपासून 28 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत रुग्णालयातील वास्तव्याच्या माध्यमातून तुरुंगवास टाळला.. मात्र 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर कुठलाही निर्णय न देता सुनावणी 30 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलताच रुग्णालयातील डॉक्टर्सनी सुद्धा केदार यांना अचानक फिट घोषित केले... आणि तडकाफडकीने केदारांची रवानगी तुरुंगात झाली... आता 30 डिसेंबर रोजी सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मिळते का?? तसेच आमदारकी वाचवण्याच्या प्रयत्नात न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी केदारांच्या मागणीवर न्यायालय काही दिलासा देते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...