Sudhakar Budgujar Profile : वादग्रस्त इतिहासात भाजपला दिसलं 'भविष्य' Special Report
काही भागात तरी प्रभाव असलेला, महत्वाचा नेता हेरा, गंभीर आरोप करुन भंडावून सोडा, चौकशी मागे लागली की पक्षात घेऊन पवित्र करा..पक्षात घेणं शक्य नसेल तर मित्रपक्षात धाडा.. या आधीच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणेच गेल्या काही वर्षात भाजपने हीच मोडस ऑपरेंडी म्हणजे काम करण्याची पद्धत राबवल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्याच शृंखलेतलं छोटंस नाव म्हणजे नाशिकचे सुधाकर बडगुजर. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत ज्यांच्यावर देशद्रोह्यांशी संबंध जोडले ते बडगुजर भाजपसाठी एवढे महत्वाचे का आहेत.. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
((मोंटाज- पूर्ण फोकस बडगुजर,त्यांचे विविध नवे जुने आजचे व्हिज, ढोलताशे, पक्षप्रवेश))
VO
हे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते...
संजय राऊतांचे नाशकातील महत्वाचे शिलेदार...
आणि आता भाजपवासी झालेले... सुधाकर बडगुजर..
ते ठाकरेंना सोडणार अशा चर्चा सुरु होत्याच
पण स्थानिक भाजपचा विरोध बघता ते कुठे जाणार याची उत्सुकता होती...
नाशकात एका लग्नात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या.
पण बडगुजर जय महाराष्ट्र करण्याआधीच ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली...
तेही चालू पत्रकार परिषदेत...
BITE - बडगुजर किंवा त्यांच्याबद्दलचा रिपीट न झालेला छोटा बाईट
VO
शिवसेनेत फूट पडल्यानंतर जे मोजके नेते ठाकरेंसोबत राहिले त्यात बडगुजर एक.
संजय राऊत यांचे नाशकातील कान आणि डोळे अशी त्यांची ओळख.
त्या जोरावर बडगुजर सतत सत्ताधारी महायुतीशी पंगे घेत राहिले.
केंद्रीय मंत्री असताना भाजपच्या नारायण राणेंविरोधात पहिली तक्रार त्यांनीच दाखल केली होती.
त्या तक्रारीवरच नारायण राणेंना तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने अटक केली होती.
अशा बडगुजरांना सगळा विरोध झुगारुन भाजपने वाजतगाजत पक्षात घेतलं.
BITE - बावनकुळे आताचा कौतुक करतानाचा बाईट
VO
बडगुजर यांचे ठाकरेंच्या शिवसेनेत स्थान पक्के होते मात्र हळूहळू त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुरु झाला...
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता सोबतची पार्टी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेली चौकशी, मुलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे
अशी एकामागोमाग एक प्रकरणं समोर आली.
भाजपने बडगुजरांना सळो की पळो करुन सोडलं. अखेर पक्षात घेऊन पवित्र केलं
BITE - भाजप बाईट- वॉशिंग मशीन
नाशकात भाजपसाठी महत्वाचे असलेले सुधाकर बडगुजर यांची कारकीर्द पाहुयात..
GFX IN
H-कोण आहेत सुधाकर बडगुजर?
२००७ साली नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले.
१४ जून २००८ रोजी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला
तेव्हापासून राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख
अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे २००९ ते २०१२ अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद
२०१२ ते २०१५ या कालावधीत महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविले.
२०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली.
या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजपच्या सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला होता.
सुधाकर बडगुजर यांचा नाशिक महानगरपालिकेत काही भागात प्रभाव असल्याने भाजपचा हिरवा कंदिल.
GFX OUT
स्थानिक भाजपकडून मोठा विरोध झाल्यानं बडगुजर यांचा पक्षप्रवेश काही काळ लांबणीवर पडला होता. तरीही गिरीश महाजन यांच्या आग्रहामुळे त्यांना भाजपमध्ये घ्यावं लागलं अशी चर्चा आहे.
BITE - राजकीय विश्लेषक, नाशिक बाईट आला आहे
VO
भाजपने राज्य आणि देशपातळीवर इतके वादग्रस्त नेते घेतले आहेत की त्यापुढे सुधाकर बडगुजर काहीच नाहीत. तरीही भाजपने पक्षाअंतर्गत अनागोंदी समोर येईल अशा पद्धतीने त्यांना पक्षात का घेतलं हे कोडं आहेच. नाशिक महानगरपालिकेच्या निकालानंतरच त्याचं उत्तर मिळू शकेल...
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
All Shows

































