SSC HSC Exams Special Report : परीक्षेवेळी केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं बंद राहणार
SSC HSC Exams Special Report : परीक्षेवेळी केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं बंद राहणार
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या दरम्यान परीक्षा केंद्रा जवळील झेरॉक्स दुकाने बंद ठेवली जाणार. दहावी बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी राज्य मंडळाकडून घेतली जात आहे.दहावी बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान मोबाईल द्वारे किंवा अन्य माध्यमातून पेपर फुटी रोखण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जात आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्र जवळील 100 मीटर अंतरावर झेरॉक्स दुकाने बंद राहतील. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी परीक्षेच्या आधी परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर कोण कोणती कार्यवाही करावी या संदर्भात राज्यमंडळाने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक भरारी पथक असणार आहे तालुक्यांमध्ये केंद्राची संख्या जास्त असल्यास एक पेक्षा अधिक भरारी पथक दहावी बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर जातील. परीक्षा काळात झेरॉक्स सेंटरवर विद्यार्थ्यांचा घोळका असतो. झेरॉक्स सेंटर्समधून मिनी कॉपी पुरवल्या जातात. असे कॉपीचे प्रकार रोखण्याकरता परीक्षा केंद्रातील १० मीटरपर्यंतच्या परीसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. बाहेरून उपद्रव थांबत नसतील परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, परिणामी 144 कलम सुद्धा लागू केला जाऊ शकतो.