Special Report : ठाकरेंच्या आमंत्रणानंतर गांधी मातोश्रीवर जाणार? : ABP Majha
मातोश्री हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येतं ते बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तीमत्व. आणि त्यांच्या भेटीगाठींसाठी रिघ लावणारा गोतावळा. शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचं या वास्तूत वास्तव्य होतं. बाळासाहेबांना भेटण्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे अनेक नेते मातोश्रीमध्ये गेलेयत. राज्याच्या राजकारणाला दिशा देणारे निर्णय चर्चा या मातोश्रीमध्ये झालेयत. पण इतक्या वर्षांच्या काळात गांधी कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीचे पाय मातोश्रीकडे कधीच वळले नाहीत. पण आता उद्धव ठाकरेंनी मविआमध्ये काँग्रेसचा हात धरल्यापासून काँग्रेस नेतृत्वासोबत त्यांची जवळीक वाढलीये. आणि मविआची सत्ता गेल्यानंतर दोनही पक्षांमध्ये अनेक विषयांवरुन मतभेद निर्माण होताना दिसतायेत.. अशाच सगळ्या वातावरणात ठाकरेंकडून राहुल गांधींना भेटीचं निमंत्रण दिलं गेलंय. त्यामुळे आता इतिहासात पहिल्यांदाच गांधी कुटुंबातली व्यक्ती मातोश्रीवर येणार असल्याचं कळतंय... पाहुयात....