Special Report On Raj - Uddhav Thackeray Alliance : टाळी दिली, राज उद्धव एकत्र येणार? चर्चांना उधाण
Special Report On Raj - Uddhav Thackeray Alliance : टाळी दिली, राज उद्धव एकत्र येणार? चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचे संकेत देणाऱ्या बातमीनं आजचा दिवस गाजला...राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा राजकारणात नेहमी होते...आता खुद्द दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी एकेक पाऊल पुढे टाकलंय...राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला...आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्यांना प्रतिसादही दिला...पण काही अटीशर्तींसह...त्यांच्या या साद-प्रतिसादामुळे राज्यातल्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे...पाहुया हा स्पेशल रिपोर्ट...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे.
हे दोन ठाकरे एकमेकांपासून वेगळे होऊन आता दोन दशकं उलटून गेलीयत.
मात्र आता मधल्या वीस वर्षांचे मतभेद विसरून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची भाषा या दोन्ही नेत्यांनी सुरु केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला पुन्हा उधाण आलं.
या चर्चेचा श्रीगणेशा झाला तो राज ठाकरेंनी दिग्दर्शक महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीमुळं.
मांजरेकरांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी आपल्यातली भांडणं ही महाराष्ट्राच्या हितापेक्षा अगदीच छोटी असल्याचं विधान केलं.
All Shows

































