Special Report On Water Issue : राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई, हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट
Special Report On Water Issue : राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई, हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट
राज्यभरामध्ये दिवसेंदिवस दुष्काळाच सावट अधिक गडत होतय. लातूर शिर्डीमध्ये अनेक भागांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागते लातूर मधल्या नागलगाव आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या आठ तांडा वस्तीवरील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्ररात्र जागाव लागते शिर्डीमध्येही अशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळते निळवंडे धरणाच्या पाट गावाच्या जवळ असतानाही पोखरी हवेली गावामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पिण्यासाठी पाणी नाहीये इथल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली या गावची आहे. या गावच्या अगदी हाकेच्या अंतरावर पाणी पुरवठा करणारी प्रादेशिक योजनेची नळपारी पुरवठा योजना आहे मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या योजनेच काम सुरू असल्यामुळे या गावाला आज पाण्यासाठी वनवन करण्याची वेळ आली आहे. या गावात कुठल्याही प्रकारचा टँकर सुरू नाहीये आणि अशा परिस्थितीत या गावकऱ्यांना आपल्याला पाण्यासाठी पैसे देण्याची वेळ आलेली आहे.
All Shows































