Special Report On Pakistan : विनाशाकडे निघालेल्या पाकिस्तानचे होणार चार तुकडे? सिंधमध्ये पाण्यावरुन रण, लोक रस्त्यावर उतरले
Special Report On Pakistan : विनाशाकडे निघालेल्या पाकिस्तानचे होणार चार तुकडे? सिंधमध्ये पाण्यावरुन रण, लोक रस्त्यावर उतरले
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करून पाकिस्ताननं जी चूक केलीय, ज्याची शिक्षा त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही...यावेळी भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान केवळ जगापासून तुटणार नाहीय, त्याचे तुकडेसुद्धा होण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तानची जगभरात बदनामी होेतेय. इतकंच नाही तर खुद्द पाकिस्तानातच वेगवेगळ्या कारणांनी लोकांच्या संतापाचा उद्रेक होतोय...
ही भविष्यवाणी हवेत केली जात नाहीय...पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रदेश असलेल्या बलुचिस्तानचे लोक स्वत:ला पाकिस्तानी समजत नाहीत...वर्षानुवर्षं तिथ बलुचींचं आंदोलन सुरू आहे...आणि स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होतेय...आता याच आठवड्यात नव्यानं तिथं आंदोलन झालं...
ज्या सिंधमधून बिलावल भुट्टो येतात त्याच सिंधमध्ये पाण्यावरून रण पेटलंय...गेल्या काही दिवसांपासून तिथले लोक रस्त्यावर उतरलेत...या प्रदेशाल सिंधुस्तान बनवण्याची मागणीही जोर धरतेय...
हा फोटो आहे पाकव्याप्त काश्मीरमधल्या गिलगिट बाल्टिस्तान...पाकिस्तानविरोधात तिथं संतापाचा उद्रेक झालाय...भारताचा भाग असलेल्या या जमिनीवर पाकिस्तानचा कब्जा आहे...तिथल्या लोकांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं...त्यामुळे त्यांनी तिथल्या सत्ताधाऱ्यांविरोधात बंड पुकारलाय...
All Shows

































