Special Report India On Turkey : विसरला उपकार, तुर्कस्तान गद्दार, सेलेबी कंपनीवर भारताचा स्ट्राईक
Special Report India On Turkey : विसरला उपकार, तुर्कस्तान गद्दार, सेलेबी कंपनीवर भारताचा स्ट्राईक
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा (Pakistan) दहशतवादी चेहरा उघडा पडला. पाकिस्तानच्या एअर डिफेन्समधली भगदाडं उघडी पडली. पाकिस्तानच्या न्युक्लिअर युद्धाच्या धमकीतील फोलपणा उघडा पडला आणि उघडा पडला तो प्रत्येक देश, ज्याने दहशतवादी (Terrorist) पाकिस्तानला भारताविरोधात मदत केली आणि ती सुद्धा साधी सुधी मदत नाही तर लष्करी मदत, आर्थिक मदत. या देशांमध्ये सर्वात मोठं नाव अर्थातच चीन त्यानंतर टर्की किंवा तुर्कस्थान आहे. चीनने भारतविरोध कधीच लपवून ठेवलेला नाही, त्यामुळे चीनने पाकिस्तानला आर्थिक, सैनिकी, तांत्रिक सगळी मदत करुन अक्षरश: अंकित केलं आहे. चीनने पाकिस्तानला मदत केल्याचं भारताला फार काही आश्चर्य वाटल नाही पण तुर्कस्तान (Turkiya) हे सरप्राईज पॅकेज ठरलं. पहलगाम हल्ल्यानंतर तुर्कस्तान पाकिस्तानसोबत ठामपणे उभा राहिला. काश्मीरप्रश्न असो किंवा भारत विरोधी कारवाया, तुर्कस्तान कायम पाकिस्तानच्या बचावासाठी तत्परतेनं पुढे आला आहे. पाकिस्तान आणि तुर्कस्थानचं नातं समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल.
तुर्कस्तान-पाकिस्तान नातं भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जन्माला आलं. तुर्कस्तानातील खलिफाला सर्व मुस्लिमांचा प्रमुख मानलं जातं. त्यावेळच्या हिंदुस्थानातील मुस्लिमांचा ओढा ऑटोमन साम्राज्याकडे आणि तुर्कस्तानच्या खलीफाकडे होता. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी आणि मित्र राष्ट्रांनी तुर्कीचा, ऑटोमन साम्राज्याचा दारुण पराभव केला. नंतर ब्रिटिशांनी ऑटोमन साम्राज्य खालसा केले, तुर्कस्थानचे तुकडे करण्याचं ठरवल्यावर जगभरातील, त्यातही अखंड हिंदुस्थानातील मुस्लिम दुखी झाले. खलीफाला हटवण्याच्या विरोधात सगळे मुस्लिम एक झाले, भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली. मुस्लिमांनी असहकार चळवळीला साथ द्यावी म्हणून महात्मा गांधींनी खिलाफत चळवळीला पाठींबा दिला. अखंड हिंदुस्थानातील मुस्लिमांनी तुर्कस्तानला जमेल ती मदत केली, धर्माच्या नावावर भारताची फाळणी झाली, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा जन्म झाला. इथल्या मुस्लिमांनी खलिफासाठी दिलेला पाठींबा तुर्कस्थानने कायम लक्षात ठेवला. त्यानंतर तुर्कस्तान-पाकिस्तान हे नातं घट्ट होत गेलं
All Shows

































