Sanjay Raut Vs Sanjay Shirsat : हॉटेलवरुन आरोप, राजकीय फोडणी; राऊतांचे गंभीर आरोप, शिरसाटांचं प्रत्युत्तर Special Report
Sanjay Raut Vs Sanjay Shirsat : हॉटेलवरुन आरोप, राजकीय फोडणी; राऊतांचे गंभीर आरोप, शिरसाटांचं प्रत्युत्तर Special Report
शिवसेनेचे दोन संजय सध्या एकमेकांविरोधात उभा आहेत. हे आहेत ठाकरेंचे संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंचे संजय शिरसाट.शिरसाटांच्या मुलाने कमी पैशात म्हणजे ६७ कोटीत एक हॉटेल विकत घेतले असा आरोप राऊतांनी केलाय. राऊतांना त्यांच्याच शैलीत उत्तर देत शिरसाटांनी प्रत्येक मुद्दा खोडून काढलाय. दोन संजयांमध्ये काय महाभारत सुरु आहे पाहुयात
संजय शिरसाट यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट काही संपता संपत नाहीयत.
एका वादातून बाहेर येईपर्यंत दुसरा वाद समोर उभा असतो.
सध्या त्यांच्या मुलावरुन त्यांना लक्ष्य केलं जातंय.
त्यांचे एकेकाळचे नेते संजय राऊत यांनी शिरसाट पितापुत्रांवर अतिशय घणाघाती आरोप केले आहेत. संजय शिरसाटांनी अतिशय कमी पैशात एक हॉटेल मिळवलं असा आरोप राऊतांनी केला. तेवढ्या वरच न थांबता राऊतांनी यात शिंदे-फडणवीस- अमित शाहांना सुद्धा जाणीवपूर्वक ओढलं.
संजय शिरसाट हे हाडाचे शिवसैनिक, गेले ३ वर्ष ते एकनाथ शिंदेंच्यावतीने किल्ला लढवत आहेत. संजय राऊतांचे आरोप ते निमुटपणे सहन करण्याची शक्यता कमीच होती. त्यांनी संजय राऊतांच्या प्रत्येक आक्षेपाचं खंडण केलं
शिरसाट तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी या वादात गरीब श्रीमंत, म्हणजे ठाकरे विरुद्ध सामान्य शिवसैनिक, मराठी माणसाचा मुलगा, त्याची प्रगती असे मुद्दे आणले. आणि भावनिक वळण देत राऊतांवरच बाजू पलटवण्याचा प्रयत्न केला.
एक उद्धव ठाकरेंचा संजय, तर दुसरा एकनाथ शिंदेंचा.. राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना हे दोन संजय, संजय राऊत आणि संजय शिरसाट आपल्या वेगळ्याच लढाईत रमले आहेत... या दोन संजयांमध्ये.. या दोन शिवसैनिकांमध्ये हा वेगळाच सामना पाहायला मिळतोय.याचा निकाल काय लागेल याचा कयास बांधणं सोपं नसेल. ब्युरो रिपोर्ट ,एबीपी माझा
All Shows

































