NCP got Fund Special Report : 'राष्ट्रवादी'च्या आमदारांवर निधीवर्षाव?
निधी वाटप..मविआ सरकारच्या काळातला कळीचा मुद्दा.. मविआच्या काळात अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटप केलं नसल्याचा आरोप झाला.. शिवसेनेच्या बंडानंतर याच आरोपांवरुन शिंदेंच्या शिवसेनेतून अनेकदा अजितदादांवर आरोपही झाले.. पण आता चित्र वेगळं आहे.. पूर्वी विरोधात असलेले दादा आता सत्तेत आलेत.. फक्त सत्तेतच नाही तर ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही झाले.. आणि सत्तेत येताच दहा दिवसात त्यांनी अर्थमंत्रीपदाची धूराही हाती घेतली.. ज्या दादांवर शिवसेनेने आरोपांची माळ लावली त्याच दादांच्या हातात राज्याच्या तिजोरीची चावी पडली.. त्यामुळे, निधी वाटपाच्या वादाचा दुसरा अंक दिसेल अशी चर्चा रंगलीय...
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

