(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Irshalgad Landslide : हुंदक्यांचे दहा दिवस ; रक्ताचं नातं हरपलं, इर्शाळवाडीवर शोककळा Special Report
इर्शाळवाडी... नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा उभा राहतो आणि काळजाला पीळ पडतो... इर्शाळगडाची दरड कोसळते आणि अख्खं गावच पोटाखाली घेते... कित्येक ग्रामस्थांचा जीव घेते... या घटनेला काल दहा दिवस झाले... या दहा दिवसांत इर्शाळवाडी निर्मनुष्य आणि शांत झालीय... जिथं शेतावावरात जाणारी माणसं दिसायची... शाळेत जाणारे चिमुकले दिसायचे... दारात बसलेले म्हातारे जीव दिसायचे...चरणारी जित्राबं आणि त्यांच्या गळ्यातल्या घंट्यांचा नाद घुमायचा... तिथं आता स्मशानशांतता पसरलीय... कोसळलेल्या घरांचे सांगाडे... चिखलाचा रेंधा आणि त्यातून वाट काढत वाहणारं, मातकट रंगाचं पाणी... आणि या सगळ्याखाली आपलं रक्ताचं माणूस दबून पडलंय... त्याच्या आयुष्याची दोरी तुटलीय... आणि नात्यांचे बंध उसवले गेलेत... कसं विसरणार हे दु:ख... आणि म्हणून... चीरशांत पडलेल्या इर्शाळवाडीतील वाचलेल्या ग्रामस्थांचे ऐकू येतायत... फक्त आणि फक्त हुंदके... पाहूयात... मन सुन्न करून टाकणारा रिपोर्ट...