Rahul Gandhi : Shiv Jayanti दिनी श्रद्धांजली, अपमान की फक्त राजकारण? Rajkiya Sholay Special Report
श्रद्धांजली... या शब्दाचा नेमका अर्थ काय? थोरपुरूषांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना श्रद्धांजली शब्दाचा वापर हा अपमान म्हणायचा का? हे सगळे प्रश्न उपस्थित झालेत ते राहुल गांधींच्या एक्स पोस्टमुळे... छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना राहुल गांधींच्या एक्स पोस्टमध्ये श्रद्धांजली शब्दाचा वापर करण्यात आलाय.. ज्यावर महायुतीच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय..आणि त्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे... त्याच राजकारणाचा आढावा घेणार आहोत राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये..
एक्स पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटलंय..
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा।
- राहुल गांधी, काँग्रेस नेते
All Shows

































