Nilesh Chvhan Special Report : बंदूकधारी निलेश चव्हाण फरार, वैष्णवीच्या छळात सहभाग असल्याची शंका
Nilesh Chvhan Special Report : बंदूकधारी निलेश चव्हाण फरार, वैष्णवीच्या छळात सहभाग असल्याची शंका
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटंबाव्यतिरिक्त आणखी एक नाव चर्चेत आहे...ते म्हणजे करिश्माचा मित्र निलेश चव्हाण याचं... हगवणे कुटुंबावर निलेश चव्हाणचा मोठा प्रभाव होता. त्यातूनच वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर करिश्मानं हे बाळ त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे दिलं होतं. तेच बाळ घ्यायला गेलेल्या कस्पटे कुटुंबियांना निलेशने बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं. निलेशवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण तो फरार आहे...दुसरीकडे त्याचे वेगवेगळे कारनामे समोर येतायत.वैष्णवीच्या बाळाचा गुन्हेगार टेक्स्ट आऊट हगवणेंच्या छळछावणीतल्या व्हिलन निलेश चव्हाण अजूनही फरार आहे... वैष्णवीच्या बाळाला डांबून ठेवणारा हा तोच बंदूकधारी निलेश चव्हाण आहे... ज्यानं वैष्णवीच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत हुसकावून लावलं... त्याच्यावर आता बाळाची हेळसांड करण्याचा गुन्हा दाखल झालाय... वारजेपाठोपाठ बावधन पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झालीय... पण तो २१ तारखेपासून फरार आहे...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























