(Source: Poll of Polls)
BMC On CAG's Radar Special Report : मुंबई महापालिका 'कॅग'च्या रडारवर?
मुंबई महापालिकेतल्या तब्बल १२ हजार कोटींच्या कामांची कॅगकडून अर्थात कॉम्पट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाकडून चौकशी करण्यात येणार आहे. कॅग ही कोणत्या सरकारी कामाचं लेखापरीक्षण करणारी केंद्र सरकारची सर्वोच्च यंत्रणा आहे. आणि मुंबई महापालिकेच्या ७६ मोठ्या कामांचं ऑडिट करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगनं मान्य केली आहे. मुंबई महापालिकेच्या त्या कामांमध्ये कोरोना केंद्राची उभारणी, रस्तेबांधणी, जमीन खरेदी आणि भेंडीबाजार पुनर्विकास अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर होणारी ही चौकशी ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानली जात आहे. मुंबई महापालिकेनं कोविड काळात उभारलेल्या कोरोना केंद्रात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदारांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात चौकशीची घोषणा केली होती. त्यानुसार आता कॅगकडून तब्बल १२ हजार कोटींच्या कामाची चौकशी होणार आहे.