Special Report Manoj Jarange : महाराष्ट्रात नव्या आघाडीची नांदी? जरांगेंचा 29 ऑगस्टचा अल्टिमेटम
SambhajiRaje, Manoj Jarange PC : मनोज जरांगेंचं कौतुक, मराठा आरक्षण मिळावं हेच उद्दिष्ट
Sambhajiraje Chhatrapati, सोलापूर: "स्वराज्य पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार निश्चित आहे. आमचे आणि मनोज जरांगे दोघांचेही ध्येय एकच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या मागण्या सारख्या आहेत. त्यांचं आणि सरकारचं बोलणं झालंय. त्यांनी 10 टक्के आरक्षण दिलेलं टिकणार कसं? हा प्रश्न आहे. आज एकंदरीत चर्चा चांगली झाली. मनोज जरांगे शेतकरी आहेत, आम्ही नावालाच शेतकरी आहेत. खऱ्या अर्थाने तेच शेतकरी आहेत. त्यांच्यसोबत माझी चांगली चर्चा झाली. आम्ही तीन तास एकत्रित बसलो" असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते अंतरवाली सराटीमध्ये बोलत होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून चालणार नाही
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून चालणार नाही. मनोज जरांगे मला बऱ्यापैकी समजले होते ते आणखी समजले. मी त्यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं. जीन्यावरुन जात असताना हात-पाय थरतात. हे चालणार नाही. तब्येत व्यवस्थित असली तर आपण जीवनात काहीही करु शकतो. त्यांची तब्येत बिघडलेली कधीही चालणार नाही.