Mahayuti Result 2024 : पराभवाचं कारण, धुसफुशीचं राजकारण ; महायुतीत आरोप-प्रत्यारोप Special Report
विजयाचे अनेक बाप असतात, मात्र पराभवाला कुणीच वाली नसतो... अशी काहीशी म्हण आपल्याकडे आहे. आताही महाराष्ट्रात महायुतीला अनपेक्षित असं अपयश आलंय. त्यातच, एकटे फडणवीस सोडले तर जबाबदारी घेण्यासाठी कुणीच पुढे आलेलं नाही. उलट, एकमेकांवर आरोप आणि पराभवाची कारणं देण्यासाठी अनेकजण पुढे आलेत.... पाहूयात...
पराभवाचं कारण, धुसफुशीचं राजकारण
पराभवावरून महायुतीत आरोप-प्रत्यारोप
समन्वय साधण्यात कमी पडलो- फडणवीस
बारामतीत मित्रपक्षांची साथ मिळाली नाही- मिटकरी
उमेदवार जाहीर करण्यात वेळ गेला- गोडसे
अहवाल देऊन उमेदवार बदलण्यात आले- केसरकर
विजय झाला की श्रेय घेण्यासाठी अनेक
वाटेकरू पुढे येतात. आणि पराभव झाला की
त्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची
नुसती चढाओढ लागते. महायुतीत फक्त देवेंद्र
फडणवीस यांनी स्वत: जबाबदारी स्वीकारत
सरकारमधून मोकळं करण्याची मागणी
केंद्रीय नेतृत्वाकडे केली असली तरी, इतर नेते
मात्र, आता एकतर दुसऱ्यावर खापर
फोडण्यासाठी किंवा पराभवाची कारणं
सागंण्यासाठी पुढे येताना दिसतायत.