Maharashtra ATS Arrested Bangladeshi : बांगलादेशींची घुसखोरी, यंत्रणांची थेट कारवाई Special Report
Maharashtra ATS Arrested Bangladeshi : बांगलादेशींची घुसखोरी, यंत्रणांची थेट कारवाई Special Report
बांगलादेशातील अस्थिरता आणि तिथल्या हिंदूवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतातील राजकीय वातावरणही पेटले आहे. दुसरीकडे अवैधपणे भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचा विळखा वाढत चालला आहे. यासगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचे संकेत दिले आणि महाराष्ट्रभरात, खास करुन मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांची धरपकड यंत्रणांनी कशी सुरु केली आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुया
महाराष्ट्रातल्या या शहरांसह विविध ठिकाणी
घुसखोरी केलेल्या बांगलादेशींविरोधात फडणवीस सरकारनं
आता फास आवळण्यास सुरूवात केली
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान याचे संकेत
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते
आणि त्यानंतरच राज्याच्या विविध भागात
या घुसखोरांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे.
खरंतर देशात अवैधरित्या राहणाऱ्या
बांगलादेशींविरोधात एकट्या मुंबईतून
३६८ जणांविरोधात कारवाई करण्यात आली होती.
त्यापूर्वी २०२२ मध्ये १४७ बांगलादेशींनी अटक करण्यात आली.
या कारवायांदरम्यान धक्कादायक गोष्ट म्हणजे
बहुसंख्य बांगलादेशींकडे भारतीय आधारकार्ड आणि
पारपत्र बनवल्याचे आढळून आले आहे.