Lashkar commander Farooq Ahmad : पहलगाममध्ये दहशतवादाचं नेटवर्क, सुरक्षा यंत्रणा सतर्क Special Report
Lashkar commander Farooq Ahmad : पहलगाममध्ये दहशतवादाचं नेटवर्क, सुरक्षा यंत्रणा सतर्क Special Report
सुरक्षा यंत्रमांच्या तपास पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचं नाव समोर आलंय. फारुखनं तयार केलेल्या नेटवर्कनं दहशतवादी हल्ला तडीस न्यायला मदत केली. लष्कर एस तोयबाचा टॉपचा कमांडर फारुख अहमद सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलाय. आणि गेल्या दोन वर्षांपासून फारुखच्या नेटवर्कनं यापूर्वीही अनेक हल्ल्यांमध्ये मदत केली केलीय.
पहलगाम हल्ल्याच्या सात दिवसांनंतर तपास यंत्रणांना हल्ल्याच्या मदतनीसांचं नेटवर्क तयचार करणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती मिळालीय...
नाव - फारुख अहमद
पद - लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर
काम - ग्राऊंड लेव्हलला नेटवर्क तयार करणं
सूत्रांच्या माहितीनुसार तपास यंत्रणांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलेल्या फारुख अहमदचा ठावठिकाणा सापडलाय...गेल्या दोन वर्षांपासून फारुख ओव्हर ग्राऊंड वर्करचं नेटवर्क तयार करण्याचं काम करतो...ओव्हर ग्राऊंड वर्कर दहशतवाद्यांना लपण्यासठी सुरक्षित जागा, जेवण, पैसे आणि इतर सोयी उपलब्ध करतात...पहलगाम हल्ल्यात त्याची महत्त्वाची भूमिका राहिल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे.
तीन दिवसांपूर्वीचा हा फोटो आहे...कुपवाड्यात फारुख अहमदचं घर सुरक्षा दलांनी जमीनदोस्त केलं.
सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातल्या तीन सेक्टरमधूमन तो काश्मीरमध्ये घुसखोरी करवतो...आणि त्याला खोऱ्यातल्या डोंगरांमधल्या रस्त्यांची चांगली माहिती आहे...
१९९० ते २०१६ पर्यंत फारुख अनेकदा पाकिस्तान आणि भारतात येत जात राहिलाय.
पहलगाम हल्ल्यानंतर त्याच्या अनेक साथीदारांना ताब्यात घेण्यात आलंय.
गेल्या दोन वर्षांत दहशतवादी फारुख एका सुरक्षित अॅपच्या माध्यमातून पाकिस्तानात बसून आपलं नेटवर्क चालवतो...पण आता तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलाय...आणि लवकरच त्याच्या नेटवर्कचं कंबरडं मोडणार आहे...आणि मग वेळ येणार आहे ती फारुखची...
All Shows































