Ladki Bahin Yojana Scam Special Report : सेवा केंद्रांनीच बहिणींना लुटलं, लाडकी बहीण योजनेत घोटाळा
Ladki Bahin Yojana Scam Special Report : सेवा केंद्रांनीच बहिणींना लुटलं, लाडकी बहीण योजनेत घोटाळा
'लाडकी'च्या निधीवर दोडक्याचा डल्ला
कुणी लाटली लाडक्या बहिणीची ओवाळणी?
निधीवर डल्ला, आरोपांचा कल्ला
लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांच्या खात्यात?
निधीवर डल्ला मारणाऱ्यांचा बंदोबस्त कधी?
तुम्ही किंवा तुमच्या घरातील कुणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असाल तर ही बातमी आवर्जून पाहा... संपूर्ण महाराष्ट्पभर सध्या लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे... योजनेचे अर्ज भरण्यासाठी अनेक लाडक्या बहिणींची लगबग सुरू आहे... मात्र नांदेडमध्ये याच योजनेचे पैसे लाटण्याचा प्रताप एका महाठगाने केलाय... महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे पुरुषांच्या खात्यात घेऊन, ते लुटल्याचा प्रकार घडलाय... पाहा नेमकं काय घडलंय...
आगामी निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण
योजना गेमचेंजर ठरण्याची अपेक्षा सरकारला
आहे. एकीकडे दीड हजार रुपये मिळत असल्याने
लाडक्या बहिणींचाही मोठा प्रतिसाद योजनेला
मिळतोय. तर दुसरीकडे याचाच फायदा
लाटण्यासाठी भामट्यांचाही सुकाळ होऊ
लागलाय... त्यामुळे लाडक्या बहिणींना
मिळणाऱ्या या ओवाळणीवर हात
मारणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करायला हवा.
अभिषेक एकबोटे, एबीपी माझा,