Hindi Language : हिंदीवसक्तीला ब्रेक की नवा मेख?त्रिभाषा सूत्रावरुन सरकारची तलवार म्यान Special Report
Hindi Language : हिंदीवसक्तीला ब्रेक की नवा मेख?त्रिभाषा सूत्रावरुन सरकारची तलवार म्यान Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
नव्या शैक्षणिक धोरणाचा दाखला देत सरकारन पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेतला खरा? पण त्याला जोरदार विरोध होत असल्यामुळे सरकारन आता आस्ते कदम जायच ठरवल. त्रिभाषा सूत्राच्या अडून सरकार हिंदी लादत असल्याचा आरोप होतोय. आता हा आरोप खोडून काढण्यासाठी सरकारने चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे सध्यातरी हिंदी सक्तीची तलवार सरकारने म्यान केली आहे. येत्या काळामध्ये हा निर्णय गुंडाळण्यात येणार की नव्याने लागू करण्यात येणार याबद्दल साशंकता आहे. चर्चा करायचं ठरवल. वर्षा निवासस्थानी यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यामध्ये नेमक काय ठरलय ते सुद्धा पाहूयात. साहित्यिक भाषातज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांसोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत मराठी मुलांच नुकसान होऊ नये यासह इतरही पर्यायांवरती सर्वांसाठी समग्र सादरीकरण केल जाईल. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवून मागच्या दाराने हिंदी लाधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतो. यावरून मनसेने सरकार आणि शाळा दोघांना सुद्धा इशारा दिला. आता हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये सरकारच राज ठाकरेंचा क्लास घेणार आहे. दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना सरकारची भूमिका समजावून सांगणार आहेत. मला अस वाटत हे आधी करायला पाहिजे होत ना जीआर काढण्याच्या आधी सगळ्यांची चर्चा करायला पाहिजे होती. ती का? गटाच्या संजय राऊतांनी मराठी कलाकारांना धारेवर धरलं. दक्षिणे मधल्या कलाकारांचे उदाहरण देत त्यांनी नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित आहेत कुठे असा सवाल सुद्धा विचारला. सोबतच एकनाथ शिंदेवरती सुद्धा निशाना साधला. आतापर्यंत मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी बैठक तुम्ही घेतली का? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे? सांगा ना मला? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना पाच साहित्यिक माहिती आहेत का? पण मराठी वरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पास सगळ्या. त्रिभाषा आणि हिंदी शक्तीच्या विरोधामध्ये मराठी साहित्य वर्तुळामधून सुद्धा नाराजीचा सूर उमटतोय. विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीपात जोशी यांनी यावरूनच देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आणि यामध्ये राजकारण असल्याचा आरोप केला. तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी इयत्ता चौथी पर्यंत केवळ मातृभाषा शिकवावी अशी सूचना केली. सरकार शासन पक्षाच्या परिवारातल्या तथाकतीत तज्ञांची समिती नेमत बाकीच्यांना कटाने दूर ठेवत त्यामुळे आम्ही जे पत्र आता या वेळेला लिहिल सरकारने अधिकाधिक पारदर्शी व्यवहार करावा इंग्रजीच्या पेक्षा मराठीची शक्ती या राज्यामध्ये असायला पाहिजे मुळामध्ये तुम्ही तिसरी भाषा या पर्यायाच्या आडून हिंदीला परत आणतात हे तुमच राजकारण तुमच्या ठेवा ना महाराष्ट्र प्रयोगशाळा आहे का तुमची शक्ती करून बघण्याची आणि पहिली ते पाचवी या कोवळ्या वयाच्या मुलांना भाषेची सरकार यावरती आस्ते कदम घेणार की चर्चेच्या नंतरही त्रिभाषा सूत्राचा घोड दामटणार हे बघणे सुद्धा महत्त्वाचे
All Shows

































